corona testing lab

सोमवारी अंबाजोगाईत स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे पालकमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

बीड

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू चाचणी(कोविड-19) साठी थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण होत असून उद्या सकाळी 10 वाजता उद्घाटन होणार आहे असे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाचा अनुषंगाने सामाजिक अंतर (सोशल डिस्टंन्सींग) पालन करुन सदर कार्यक्रम साधेपणाने करण्यात येणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळालेल्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड – 19 विषाणू चाचणी प्रयोगशाळेस आवश्यक सामग्री तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची मान्यता मिळाली असून उद्या प्रत्यक्ष चाचणीला सुरुवात होणार आहे.

Tagged