waiting

76 नमुने : आजचा दिवस जिल्ह्यासाठी महत्वाचा

बीड

बीड : बीड जिल्ह्यासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. कारण जिल्ह्यातून तब्बल 76 स्वॅब नमुने तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले आहेत.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार बीडच्या जिल्हा रुग्णालयातून 6, बीडच्या कोविड केअर सेंटरमधून 9, स्वाराति अंबाजोगाई 6, कोविड केअर सेंटर अंबाजोगाई 25, उपजिल्हा रुग्णालय केज 20, ग्रामीण रुग्णालय आष्टी 2, आणि उपजिल्हा रुग्णालय परळी येथून 8 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्वॅब पाठविले गेल्याने सहाजिकच जिल्ह्याचं लक्ष त्याकडे लागले आहे.

Tagged