बीड : परळीच्या बड्या नेत्याला दिलासा ! बीडचा एक पॉझिटीव्ह

महाराष्ट्र

पॉझिटीव्ह रुग्णाचा हैद्राबाद प्रवासाचा इतिहास
बीड :  आज पाठविण्यात आलेल्या 76 नमुन्यांपैकी 75 निगेटीव्ह आले असून एकजण पॉझिटीव्ह आढळून आलेला आहे. पॉझिटीव्ह आढळलेला रुग्ण हा बीडमधील आहे. तो झमझम कॉलनी बीड येथे राहणारा असून 61 वर्षीय हा रुग्ण हैद्राबादहून आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी राधाकिसन पवार यांनी दिली.

परळीच्या बड्या नेत्याला दिलासा
जिल्ह्यातून आज पाठविण्यात आलेल्या स्वॅबमध्ये परळीची औरंगाबादेत पॉझिटीव्ह आढळून आलेल्या महिलेच्या संपर्कातील कुटुंबातील काही सदस्यांचा समावेश होता. हे सर्व स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. या महिलेच्या कुटुंबाच्या संपर्कात परळीचे बडे नेते होते. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्ह्यातील नेत्यांचंही टेन्शन वाढलं होतं. तीन दिवसांपासून आरोग्य विभागातील काही अधिकारी परळीत ठाण मांडून होते. संबंधीत नेतेही स्वतःहून होम क्वारंटाईन झालेले होते. आज परळीचे सर्व अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र परळीतील त्या महिलेला लागण नेमकी कुठून झाली याचा शोध आरोग्य विभाग अजुनही घेत आहे.   

धारूर 20 पैकी 20 निगेटीव्ह
धारूर तालुक्यातील अंबेवडगावच्या तीन पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतर 20 जणांचे स्वॅब आज तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे सर्वच स्वॅब निगेटीव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे यांनी कार्यारंभशी बोलताना दिली. त्यामुळे अंबेवडगावचा धोका तुर्तास टळला असल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळालेला आहे. त्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या दोन सुना कालच पॉझिटीव्ह असल्याचे समोर आलेले होते. आता फक्त अंबेवडगावच्या रुग्णाच्या संपर्कातील माजलगावच्या हॉस्पिटलमधील स्वॅब घेणे बाकी आहे. शिवाय उद्या देखील अंबेवडगाव येथील दोघांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.

महत्वाची सुचना :  संबंधीत बातमीची लिंक व्हॉटसअ‍ॅप, फेसबूक व इतर सोशल प्लॅटफॉर्मवर फॉरवर्ड/शेअर केल्यास आम्हाला आनंदच आहे. परंतु ही बातमी आमच्या परवानगीशिवाय जशीच्या-तशी कॉपी करून ती टेक्स्ट स्वरूपात व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर, फेसबूकला पोस्ट करणे किंवा इतर वेबसाईटवर प्रकाशीत करणे, यातून कॉपीराईट कायद्याचा भंग होऊ शकतो. कार्यारंभकडून बातमी वेळोवेळी अपडेट केली जाते. परंतु त्या आधीच बातमीचा स्क्रीन शॉट काढून तो व्हायरल करून त्यातून चुकीचा मेसेज बाहेर गेल्यास त्याची जबाबदारी कार्यारंभ घेत नाही.