गणेशोत्सव साजरा करा पण…

महाराष्ट्र

मुंबई ः कोरोनाचं संकट गहिरं होत असताना, अवघा दोन महिन्यांवर आलेला गणेशोत्सव कसा साजरा होणार अशी शंका प्रत्येक मनामध्ये होती. यांचं निरसन आज मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक गणेश मंडळाशी घेतलेल्या बैठकीत झालं.

सार्वजनिक गणेश मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी करोनाचा संकट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंबंधी सूचना दिल्या.

करोनामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीतघेण्यात आला आहे. राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून मंडळांनी निर्णय मान्य करणार असल्याचं सांगितलं आहे.

मिरवणुकांना परवानगी नाही
गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये मंडळांच्या पदाधिकार्‍यांसोबत आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात येत आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged