दलित युवकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण

केज क्राईम

तिघांवर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल

केज :  पाठीमागून येणार्‍या दुचाकीला जोराची धडक देऊन त्या नंतर दोघांना बोलावून घेऊन एका सोळा वर्षीय दलित दलित युवकास लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी केज तालुक्यातील गोटेगाव येथे तिघांवर अ‍ॅट्रोसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, दि.13 जून रोजी केज तालुक्यातील गोटेगाव येथील बाळासाहेब बचुटे यांचा सोळा वर्ष वयाचा मुलगा चि. अभिजित बचुटे हा दुपारी 4:30 हा केजडी नदीला आलेला पूर पाहून मोटारायकलवरून घरी परत येत असताना त्याला माळेगाव ता. केज येथील अंगद गव्हाणे यांनी पाठीमागून जोराची धडक दिली. त्या नंतर अंगद गव्हाणे यांनी त्यांच्या गावात फोन करून रामदास गव्हाणे व गोविंद गोरे यांना बोलावून घेतले. त्या तिघांनी अभिजित यास लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अंबाजोगाई येथे अभिजित बचुटे यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारी वरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात 324, 323, 506, 34 आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(आर) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक राहुल धस हे पुढील तपास करीत आहेत.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged