मांजरसुंबा घाटात नर्सचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.26 : येथील मांजरसुंबा घाटामध्ये सोमवारी (दि.24) सायंकाळी 5 च्या सुमारास नर्सचा ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. बाजुलाच स्कुटी आढळून आली. घटनास्थळी बीड ग्रामीण व नेकनूर पोलीसांनी धाव घेतली आहे. ही आत्महत्या आहे की, घातपात याचा तपास पोलीस करत आहेत.
सोनाली अंकुश जाधव (वय 26 शिवाजीनगर, बीड) असे नर्सचे नाव आहे. सदरील विवाहिता ही येथील दिप हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. सोमवारी सायंकाळच्या सुमारास गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह मांजरसुंबा घाट परिसरात आढळून आला. बीड ग्रामीण पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. घटनास्थही एक स्कुटी (एमएच-20- इबी-2504) आढळून आली आहे. ही आत्महत्या आहे की, घातपात याचा तपास ग्र्रामीण पोलीस करत आहेत.

Tagged