बीड दि.27 : तालुक्यातील पाली परिसरामध्ये ओढणीच्या सहय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह सोमवारी (दि.26) आढळून आला होता. सदरील तरुणीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे समारे आले आहे. प्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनाली अंकुश जाधव (वय 26 रा.शिवाजीनगर, बीड) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती शहरातील दिप हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कार्यरत होती. येथीलच एका खाजगी लॅबमधील अक्षय राजाभाऊ आव्हाड (वय 27 रा.डोईफोडवाडी) याच्याशी प्रेमसंबंध आले होते. सोनालीने अक्षयकडे लग्नासाठी हट्ट धरला होता. मात्र अक्षयने लग्नाला नकार दिल्याने या नैराश्यातून सोनालीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकारणी सोनालीचा भाऊ अजय जाधव याने दिलेल्या फिर्यादीवरून नेकनूर पोलीस ठाण्यात अक्षयविरुद्ध कलम 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार किशोर काळे करत आहेत.