accident

स्कार्पिओ दुचाकीच्या धडकेत एक ठार एक जखमी

क्राईम न्यूज ऑफ द डे माजलगाव

राष्ट्रीय महामार्गावरील नवा मोंढा येथील घटना

माजलगाव :  राष्ट्रीय महामार्गावर फुलेपिंपळगाव येथील नवा मोंढा परिसरात स्कार्पीओ व दुचाकीमध्ये समोरा-समोर धडक होवून दुचाकीवरील एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सांयकाळी पाचच्या सुमारास घडली.

तालुक्यातील शहाजानपुर येथील सिध्देश्वर अंकुश बादाडे व राजाराम सखाराम उबाळे हे दुचाकी (एम.एच.44, जे.442) ने माजलगावकडे येत होते, दरम्याण राष्ट्रीय महामार्गवरील फुलेपिंपळगाव येथील नवा मोंढा परिसरात माजगावहून गढीकडे जाणार्‍या स्कार्पीओने (एम.एच.28, व्ही.7080) जोराची धडक दिली. यात दुचकीवरील सिध्देश्वर अंकुश बादाडे (वय 34 रा.शहाजानपुर ता.माजलगाव) हा जागीच ठार झाला तर राजाराम सखाराम उबाळे (वय 32) हे गंभीर जखमी झाले. जखमीवर माजलगाव ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असून स्कार्पीओ मधील जखमी खाजगी रूग्णालय उपचारार्थ दाखल केल्याचे समजते. अपघात होताच त्या ठिकाणी माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस जमादार शरद पवार, राऊत यानी धाव घेतली होती.

Tagged