tractor

टॅ्रक्टरखाली चिरडून विद्यार्थ्याचा मृत्यू

क्राईम गेवराई बीड

गेवराई तालुक्यातील लुखामसला येथील घटना

 गेवराई : चुलता ट्रॅक्टर चालवित आसताना, बाजूला बसलेल्या पुतण्याचा अचानक तोल गेल्याने सोळा वर्षीय विद्यार्थ्याचा त्याच ट्रॅक्टरखाली चिरडल्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील लुखामसला येथे शुक्रवारी दि.26 रोजी सकाळी घडली. घटनेने गावावर शोककळा पसरली असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

गेवराई तालुक्यातील लुखा मसला येथील आकाश दशरथ उमाप (वय 16) हा विद्यार्थी शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास आपल्या काका सोबत ट्रॅक्टरमध्ये बसून बाहेर निघाला होता. त्याचा ट्रॅक्टरमधून अचानक तोल गेल्याने आकाश उमाप याच ट्रॅक्टरखाली येऊन चिरडला गेला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह गेवराई उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून, बीट अंमलदार पोना.फड व तळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

Tagged