bussnesmen suside

बाळाला औषध न दिल्यामुळे पती रागावला; पत्नीने केली आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे पाटोदा बीड

 पाटोदा :  नऊ महिन्यांच्या बाळाला औषध का दिले नाही म्हणून रात्री पतीने पत्नीवर राग काढला. याच कारणातून पत्नीने दि.26 रोजी घरात गळफास घेवून आत्महत्या केली. यामुळे नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाल्याची दुर्दैवी घटना शिरुर तालुक्यातील रायमोह येथे घडली आहे.

रायमोहा येथील शितल अमोल चव्हाण (वय 21) असे मयताचे नाव आहे. शितलने बाळाला औषध न दिल्यामुळे पती अमोल हा तिच्यावर रागावला. याचाच राग मनामध्ये ठेवून दि.26 रोजी घरात कोणीही नसताना दुपारी चार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी घरी कोणीही नव्हते, सासु सासरे पुणे येथे आहेत तर पती अमोल हा शिरुर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत कामास होता. रायमोहा येथिल ग्रामीण रुग्णालयात डॉ.दत्तात्रय जवरे यांनी शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पाटोदा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सफौ.धरणीधर कोळेकर यांच्यासह जमादार गर्जे, व हे.कॉ मिसाळ हे पुढील तपास करत आहे. किरकोळ रागातून आईने आत्महत्या केल्याने नऊ महिण्याचे बाळ पोरके झाल्याने रायमोहा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tagged