खून प्रकरणातील कोरोना पॉझिटिव्ह आरोपी फरार

कोरोना अपडेट क्राईम

बीड : खून प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी (दि.29) हा आरोपी फरार झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
केज तालुक्यातील दहिफळ ववडमाऊली येथील पुजाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथून आरोपीस अटक करण्यात आली होती.
22 जुलै रोजी त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत तो आरोपी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने आणि कोरोनाची लक्षणे सौम्य झाल्याने त्याला आयटीआयमधील कोव्हीड सेंटरमध्ये रेफर करण्यात येणार होते. मात्र याच वेळी त्याने संधीचा फायदा घेत रुग्णालयातून पळ काढला. बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.