ACB TRAP

30 हजाराची लाच मागणार्‍या पोलीस निरीक्षकावर कारवाई

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा

बीडच्या एसीबीची औरंगाबादेत कारवाई

बीड : वाळू वाहतूक करण्यासाठी लोकेशन देणार्‍या मुलांवर कारवाई न करण्यासाठी तीस हजारांच्या लाचेची मागणी केली. ही लाच मागितल्या प्रकरणी बीडच्या लाचलुचतप प्रतिबंधक विभागाने पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि.28) औरंगाबाद येथील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली.

सय्यद शौकत अली (पोलीस निरीक्षक, शिल्लेगाव पोलीस ठाणे नेमणूक) असे लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. सोमवारी तक्रारदार यांचे 407 टेम्पो हे वाळू वाहतुकीसाठी वापरतात. त्यासाठी पोलीसांचे लोकेशन देणार्‍या मुलांवर सीआरपीसी 109 प्रमाणे कारवाई न करण्यासाठी तीस हजार रुपयांची लाचेची मागणील केली. यावेळी तक्रारदार यांच्याकडील शासकीय व्हाईस रेकॉर्डर हिसकावून घेत त्यामधील संभाषण डिलीट करण्यासाठी मेमरी कार्डला ओरखडे मारुन पुरवा नष्ट केला व सरकारी मालमत्ता मेमरी कार्ड निकामी केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोनि.राजकुमार सायसिंग पाडवी, पोना.हनुमान गोरे, राजेश नेहरकर, पोशि.मनोज गदळे, प्रदीप वीर, चालक गणेश म्हेत्रे यांनी केली.

Tagged