निकाल

दहावीचा निकाल जाहीर

करिअर न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

राज्याचा निकाल 95 टक्के

 मुंबई: अखेर सर्व विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी हा निकाल एक वाजता पाहू शकतील.

राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली आहे. कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे.  औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.

मागच्या वर्षी 77.10 टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असं मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितलं.

विभागनिहाय टक्केवारी:
पुणे – 97.34 टक्के
नागपूर – 93.84 टक्के
औरंगाबाद – 92 टक्के
मुंबई – 96.72 टक्के
कोल्हापूर – 97.64 टक्के
अमरावती – 95.14 टक्के
नाशिक – 93.73 टक्के
लातूर – 93.09 टक्के
कोकण – 98.77 टक्के

यंदाही निकालात मुलींची बाजी

यंदा 96.91 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी जास्त आहे.

तुमचा स्वतःचा निकाल पाहण्यासाठी मंडळाच्या खालील लिंकवर क्लिक करा…

अधिकृत वेबसाईट:
http://www.mahresult.nic.in/

http://www.maharashtraeducation.com/

Tagged