अंबाजोगाई : कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून धोका वाढला आहे. यातच लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात असल्याचे चित्र आहे.
अशात केज मतदारसंघाच्या आ. नमिता मुंदडा या देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. याबाबतची माहिती त्यांनी स्वतः दिली आहे. त्यांनी म्हटले की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेत आहे व आयसोलेशनमध्ये आहे.