MURDER

जानेगाव येथे महिलेचा खून

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

केज दि.25 : शेतात दगडाने ठेचून महिलेचा खून केल्याची घटना केज तालुक्यातील जानेगाव शिवारात गुरुवारी (दि.25) रात्रीच्या सुमारास घडली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आशा अनिल चटप (वय 35) असे मयत महिलेचे नाव आहे. जानेगाव परिसरामध्ये घराच्या शेजारीच शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि.संदीप दहीफळे यांनी धाव घेतली. त्यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Tagged