परभणी एसीबीच्या पथकाची कारवाई
बीड : परळी येथील रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहायक सहायक निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचार्यांना एक लाखांची लाच स्वीकारताना परभणी एसीबीच्या पथकाने गंगाखेड रेल्वे पोलीस ठाण्यात गुरुवारी रंगेहाथ पकडले.
सहायक पोलीस निरीक्षक माधुरी महादेवराव मुंढे (वय 32), पोलीस हवलदार संजय त्रंबक भेंडेकर (वय 53), पोलीस शिपाई प्रेमदास दयाराम पवार (वय 37) अशी लाचखोरांची नावे आहेत. हे तिघेही परळीच्या रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. याप्रकरणातील तक्रारदार व्यक्ती 45 वर्षीय असून त्यांच्याविरुद्धच्या अॅट्रॉसिटी अर्जामध्ये मदत करून अर्ज मागे घेण्यासाठी व त्यांची गंगाखेड रेल्वे स्टेशन येथील कँटीन चालवू देण्यासाठी लाच मागण्यात आली होती. तक्रारदार यांना पंचसमक्ष 1 लाख रूपयांची लाचेची मागणी करुन संजय भेंडेकर यांनी सदर लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारून लाचेच्या रकमेसह पळून गेले. तिन्ही लाचखोरांविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणी एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.