अंबाजोगाईत कंत्राटदारांची गुंडागिरी; मला रिव्हॉल्व्हर द्या!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे

कार्यकारी अभियंत्यांच्या पत्राने खळबळ

अंबाजोगाई : कंत्राटदार धमक्या देऊन, कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात. त्यामुळे कामकाज करता यावे, यासाठी रिव्हॉल्व्हर द्यावी अशी मागणी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रकारामुळे बांधकाम विभागासह कंत्राटदारांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संजयकुमार कोकणे असे रिव्हॉल्व्हरची मागणी करणाऱ्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागअंतर्गत कामे मिळविण्यासाठी काही राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गुंडागिरी सुरू असल्याच्या चर्चा होत्या, अशातच आता कंत्राटदारांचीही गुंडागिरी वाढली असल्याचे समोर येत आहे. कार्यकारी अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याची ही अवस्था असेल तर कर्मचाऱ्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. संजयकुमार कोकणे हे मूळ नाशिकचे असून काही दिवसांपूर्वीच येथील सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू झाले आहेत. येथील कारभाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय, आपल्या जीवाला धोका असून याठिकाणी आपल्यावर ॲट्रॉसिटी होऊ शकते, असा भीती जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

Tagged