स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
बीडदि.15 ः मोबाईल टॉवरच्या बॅटर्या, वाहनातील डिझेल चोरणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. रविवारी रात्री छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर येथे कारवाई करून पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या टोळीने बीड ग्रामीण हद्दीतही मोबाईल टॉवरच्या ठिकाणी चोरी केल्याचे समोर आले आहे.
यावेळी पोलीसांनी शुभम महादेव खोत (वय 24, रा.देवळाई खाजा नगर, औरंगाबाद), संतोष उर्फ माया शिवाजी पवार (वय 24, कृष्णा नगर घोडे गाव जि.अहमदनगर), वैभव अशोक पाईकराव (वय 23 रा. देवळाई रोड शिवाजीनगर छत्रपती संभाजीनगर), मल्हारी योगजी मिसाळ (वय 52 पाईपलाईन रोड अहमदनगर), साईनाथ उत्तम राठोड (वय 23 रा. म्हाडा कॉलनी, देवळाई छत्रपती संभाजीनगर) या पाच जणांना अटक करण्यात आली. अभय अशोक काळे (रा.अहमदनगर) दत्ता भानुदास घुले (रा. कारखेल ता. आष्टी जि. बीड) हे दोघे फरार असल्याचे सुत्रांनी सांगितले. या टोळीने बीड ग्रामीण हद्दीत दोन ठिकाणी गुन्हा केल्याची कबुली दिली. इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतिष वाघ, उपनिरीक्षक संजय तुपे, पोह.शेख नसीर, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, सतीश कातखडे, चालक गणेश मराडे यांनी केली.