बीड दि.23 : येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शेख अब्दुल अतिख (वय 38 रा. ताकडगाव रोड, गेवराई, ता, गेवराई) याने तक्रारदारास एक हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीने गुरुवारी (दि.23) केली.
तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॉटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता, आरोपी भूकरमापक शेख अब्दुल अतिख यांने सदरच्या प्लॉटची मोजणी मार्च 2022 मध्ये करून हद्द कायम करून दिली, केलेल्या कामाकरिता 17 जून 2022 रोजी दोन मजुरांची मजुरी प्रत्येकी 500 रुपये असे 1000 रुपये लाचेची मागणी केली. एक हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसिबीचे उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अमोल धस
श्री.अमोल धस, पोलीस अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी यांनी केली.