sanjay raut

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे – खा. संजय राऊत

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

बीड – एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदारांचे संख्याबळ वाढल्याने आता शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची सर्वात मोठी मागणी मान्य करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, बंडखोर आमदारांनी 24 तासात परत यावं, असे आवाहन केले आहे.


एकनाथ शिंदे यांच्या गटात आज पर्यंत शिवसेना आणि अपक्ष मिळून 42 आमदारांचे संख्याबळ झाले आहे. इकडे शिवसेनेकडे केवळ 17 आमदारांचे संख्याबळ असल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

Tagged