फक्त शिवसैनिकांनी सांगावे, मी सर्वकाही सोडायला तयार-उद्धव ठाकरे

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

मुंबई दि.22 : काँग्रेसचे कमलनाथ, शरद पवार यांनी फोन करुन सोबत असल्याचे सांगितले. त्यांचा हा माझ्यावरील विश्वास आहे. परंतु माझ्याच लोकांना माझ्यावर विश्वास नाही. त्यांना मी मुख्यमंत्री नको आहे. मी त्यांना माझं मानतो पण ते मला त्यांचे मानत आहेत की नाही माहित नाही. त्यांनी इथेच मला हे बोलून दाखवायला हवे होते. मी ओडून, ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. यामुळे नुकसान कुणाचे होत आहे. ज्यांना मी नको आहे, त्यांनी ते समोर येवून सांगावे. मला माझ्याच लोकांमुळे जास्त वेदना होत आहेत. मी राजीनाम्याचे पत्र तयार करुन ठेवले आहे. आमदारांनी यावे माझ्या राजीनाम्याचे पत्र घेवून जावे. हा लाचारीचा प्रश्न नाही, मजबुरीचाही प्रश्न नाही. मी कुठल्याही आव्हानाला घाबरणारा नाही. मी शिवसैनिकांना आव्हान करतोय. त्यांनी खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना राहिला नाही असे आरोप करु नयेत. त्यांच्यासाठी माझ्याकडे उत्तर आहे. त्यांनी मला विचारावे मी पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे. फक्त शिवसैनिकांनी सांगावे की, तुम्ही पदाच्या लायक नाहीत. असे मी सर्वांना अवाहन करतो. तुम्ही थेट सांगा उद्धव ठाकरे तुम्हाला नकोय. मी सर्वकाही सोडायला तयार आहे. असेही भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंड पुकारलेल्या शिवसेना नेत्यांना नाव न घेता घातली आहे.

पुढे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. कोव्हिड सोबत आपण लढलो. त्या कठीण काळामध्ये आपण त्यासोबत लढलो आहेत. प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाटेला पहिल्या काळातच कोव्हिड आला. देशात झालेल्या सर्व्हेमध्ये टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये आपले नाव होते. शिवसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. मुख्यमंत्री भेटत नाहीत. त्याचे कारण माझी शस्त्रक्रिया झाली होती हे त्याचे कारण होते. त्यामुळे कुठलेही कामे बंद नव्हती. मी ऑनलाईन बैठका घेत होतो. शिवसेना आणि हिंदूत्व हे घट्ट एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. शिवसेना हिंदुत्वापासून कधीही दूर होणार नाही. हिंदूत्व हा आमचा श्वास आहे. हिंदूत्वासाठी कुणीकुणी काय केले हे बोलण्याचे वेळ नाही. विधानभवना हिंदूत्वाबद्दल बोलणारा मी पहिला व्यक्ती आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत आणि आत्ताच्या शिवसेनेत काहीच बदल नाही. त्यांचेचे विचार पुढे नेत आहोत. आजही हिंदू आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहेत. स्वबळावर 64 आमदार निवडूण आणणारी हीच ती शिवसेना आहे. मी स्वतः मुख्यमंत्री आहे. सध्या राज्यात काय चालले आहे याची सर्वांना कल्पना आहे. शिवसेनेचे आमदार गायब झाले. आगोदर सुरत नंतर गोहवटी गेले. याबद्दल मी काहीही बोलणार नाही. हे बाळासाहेबांना पटत नव्हतं, मलाही पटत नाही. कसलाही अनुभव नसताना मी जबाबदारी जिद्दीने पार पाडण्याचे काम करत आहे. बाळासाहेबांचेच विचार घेवून पुढे जाणार आहे. शरद पवार साहेब, सोनिया गांधी यांनी माझ्यावर विश्वास टाकला, कुठलाही अनुभव नसलेला व्यक्ती मुख्यमंत्री झाला. परंतू उगीच मध्ये रडकुंडीचा घाट आणला जात आहे. हे असे राजकारण कुणाच्याही फायद्याचे नाही. प्रशासनाने पण मला खुप सहकार्य केलेले आहे. कमलनाथ, शरद पवार यांनी फोन करुन सोबत असल्याचे सांगितले. त्यांचा हा माझ्यावरील भरोसा आहे. परंतु माझेच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल. मी त्यांना माझे मानतो. ते मला त्यांचे मानत आहेत की नाही माहित नाही. त्यांनी इथेच मला हे बोलून दाखवायला हवे होते. मी ओडून, ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. यामुळे नुकसान कुणाचे होत आहे. ज्यांना मी नको आहे, त्यांनी ते समोर येवून सांगावे. मला माझ्या लोकांमुळे जास्त वेदना होत आहेत. आज मी राजीनामा देत आहेत. पत्र तयार करुन ठेवले आहे. आमदारांनी यावे माझ्या राजीनाम्याचे पत्र घेवून जावे. हा लाचारीचा प्रश्न नाही, मजबुरीचाही प्रश्न नाही. मी कुठल्याही आव्हानाला घाबरणारा नाही. मी शिवसैनिकांना आव्हान करतोय. त्यांनी खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना राहिला नाही. त्यांच्यासाठी माझ्याकडे उत्तर आहे. त्यांनी मला विचारावे मी पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे. फक्त शिवसैनिकांनी सांगावे की, तुम्ही पदाच्या लायक नाहीत. असे मी सर्वांना अवाहन करतो. तुम्ही थेट सांगा उद्धव ठाकरे तुम्हाला नकोय. मी सर्वकाही सोडायला तयार आहे. असेही भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंड पुकारलेल्या शिवसेना नेत्यांना नाव न घेता घातली आहे.

Tagged