dhananjay-munde

पालकमंत्र्यांसह पाच जण कोरोनामुक्त

बीड

बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक, वाहन चालक व इतर तिघांना कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच बीड शहरातील मसरत नगर भागातील तिघांना सुटी दिली आहे.

दोन दिवसांत पाच जणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यामुळे एकूण 98 बाधितांपैकी 77 जण कोरोनामुक्त झालेले आहेत. चौघांचा मृत्यू झाला आहे. पालकमंत्र्यांनाही दोन दिवसात सुटी मिळणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून मुंबईत उपचार सुरू आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांचे स्वीय सहायक यांनी अधिकृत माहिती कळविण्यात येईल सांगितले आहे.

Tagged