एकनाथ शिंदे सायंकाळी 7 वाजता घेणार पत्रकार परिषद

देश विदेश न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

बीड
दि.22 : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे बंड पुकारुन मंत्री, आमदारांना सोबत घेवून गुवाहाटीत दाखल झालेले आहेत. दरम्यान त्यांच्याकडे आणखी शिवसेनेतील आमदार, मंत्री त्याच बरोबर खासदारही रवाना झालेले आहेत. एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे काय वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राजकिय क्षेत्रात खळबळ उडालेली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सकाळी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत. काय निर्णय घेणार आहेत? याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. परंतू त्यांनी दिेलेल्या वेळेपेक्षा अर्धातास उलटूनही त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद न साधलेल्याने विविध प्रश्न निर्माण होत आहेत. तर एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी 7 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे काय वक्तव्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तांत्रिक कारणामुळे फेसबुक लाईव्ह नाही
दरम्यान काही वेळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधतील, असे मुख्यमंत्री कायालर्यातून कळवण्यात आले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधणे शक्य झालेले नाही. त्यामुळे वर्षा बंंगल्यावरच उद्धव ठाकरे हे थेट पत्रकार परिषद घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Tagged