चार दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा पालीच्या धरणात मृतदेह सापडला

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

नेकनूर दि.10 : बीड तालुक्यातील पाली बिंदुसरा धरणाच्या काठावर नेकनुर येथील तरुणाचे कपडे व आधार कार्ड आढळून आले होते. हा तरुण बिंदुसरा धरणात बुडला असल्याचा संशय पोलिसांना आला होता. तीन दिवसाच्या शोध मोहीमनंतर शुक्रवारी (दि.10) मृतदेह आढळून आला आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

केशव भिकाजी काशीद (वय २९ रा.नेकनूर ह.मु.बार्शी नाका , अशोकनगर, बीड) असे मयताचे नाव आहे. हा तरुण घरातून चार दिवसापासून बेपत्ता होता. 7 फेब्रुवारीला मामा व त्यांचे कुटुंबीय हैदराबादला गेले. त्यानंतर केशव कोठे गेला, त्याचे काय झाले. याचीही काहीही माहिती नव्हती. त्यांनतर 8 तारखेला बिंदुसरा धरणाच्या काठावर त्याचे कपडे, घड्याळ, आधार कार्ड आढळले. त्यानंतर बीड ग्रामीण पोलीसांनी, अग्निशमन दल यांनी शोध मोहीम सुरू केली. दोन दिवसांनंतर हा मृतदेह आढळून आला.

Tagged