परळी : 1 वाजेपर्यंत 16 व्यापारी पॉझिटिव्ह

आष्टी कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

परळी : परळीचा कोरोनाचा आकडा दरदिवशी वाढताच असतो. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अँटिजन टेस्ट मोहिमेला परळीत प्रतिसाद मिळाला आहे. आज (दि.18) दुपारी 1 वाजेपर्यंत 500 व्यापारी, किरकोळ विक्रेत्यांनी टेस्ट केल्या. यापैकी 16 व्यापारी पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांनी दिली आहे.

शहरातील लोकनेते गोपीनाथराजवी मुंडे नटराज रंग मंदिर, बसस्थानक, श्री सरस्वती विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र (सावता माळी मंदिराजवळ) या चार केंद्रांवर अँटिजन टेस्ट सुरु आहेत. सकाळपासूनच या केेंद्रांवर कोरोनाच्या अ‍ॅटिजन टेस्टला सुरुवात करण्यात आली असून व्यापार्‍यांसह किरकोळ विक्रेत्यांनी तपासणीसाठी हजेरी लावली. अँटिजन टेस्ट बुथचे नोडल आफिसर म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलिप गायकवाड काम पाहात आहेत. या चार केेंद्रांवर एक डॉक्टर, दोन टेक्निशन, एक वार्ड बाय, चार शिक्षक, चार डाटा आफरेटर, दोन पोलिस कर्मचारी, एक वाहन, एक फिरते वाहन, दोन अंबुलन्स, दोन स्कुल बस आदी यंत्रणा बुथ निहाय सज्ज आहे. उपविभागीय अधिकारी गणेश महाडिक, तहसीलदार विपीन पाटिल, वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे, नायब तहसिलदार बाबुराव रुपनर, नोडल अधिकारी डॉ.दिलीप गायकवाड आदी अधिकारी वर्गानी बुथ केंद्रावर नियंत्रण केले आहे. दरम्यान, शहरात आजही 16 व्यापारी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Tagged