harssh poddar

पत्त्याच्या क्लबवरील छाप्यात देवान-घेवाण प्रकरणी पोलीस कर्मचारी निलंबित

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड : पत्याच्या क्लबवर कारवाई केल्यानंतर पैशाची मागणी केली. याची व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली. या प्रकरणी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सदरील पोलीस कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

     अंबाजोगाई तालुक्यातील धर्मापूरी येथे पत्त्याच्या क्लबवर रेड करण्यात आली होती. यावेळी आरोपींना पोलीस कर्मचार्‍याने पैशाची मागणी केली. याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी तडकाफडकी पोलीस कर्मचार्‍यास निलंबित केले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्याकडे प्रकरणाची माहिती विचारणा केली असता त्यांनी या कारवाईबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितले.

Tagged