विनायक मेटे यांच्यावर बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

बीड

शिवसंग्राम कार्यालयाकडून अधिकृत माहिती

बीड : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार विनायकराव मेटे यांच्यावर बीडमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपापाठीमागे कॅनॉल रोड, सिद्धिविनायक पार्कमध्ये उद्या (दि.15) दुपारी 3.30 वाजता अंत्यविधी होईल, अशी अधिकृत माहिती शिवसंग्राम कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

बीड शहरातील कॅनॉल रोडवरील सुमित नगर येथील परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. निश्चित करण्यात येणाऱ्या जागेची पाहणी करताना पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलीस उपाधीक्षक संतोष वाळके, बीड ग्रामीणचे संतोष साबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख खांडे यांच्यासह शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, नारायण काशीद, विनोद कवडे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते. दरम्यान, माजी मंत्री पंकजा मुंडे, जयदत्त क्षीरसागर, धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Tagged