corona virus image

कोरोना योद्धयांना दिलासा; एसपींचाही स्वॅब निगेटीव्ह

बीड

बीड : जिल्ह्यातून शुक्रवारी ७६ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील कारंजा रोडवरील दोघे पॉझिटिव्ह आले असून कोरोना योद्धयांचे नमुने मात्र निगेटिव्ह आले आहेत.

पालकमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागन झाल्याचे समोर आल्यानंतर बीडच्या पोलीस अधिक्षकांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन केले होते. त्यांच्यासह पालकमंत्र्यांच्या संपर्कात आलेले २६ पोलीस कर्मचारी आणि चार अधिकारी यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. सायंकाळी या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने बीड जिल्हा पोलीस दलाने सुटकेचा निःश्वास सोडला.

Tagged