निवडणूक आयोगाकडून कच्च्या आराखड्यांची तपासणी
बीड : जिल्ह्यातील ६९ जिल्हा परिषद गट आणि १३८ गणांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने कच्चे गट, गणांचे आराखडे तयार केले आहेत, ते शनिवारी (दि.१२) निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता लवकरच आराखडे प्रसिद्धीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
जिल्ह्यातील गट, गणांचे कच्चे आराखडे तहसील पातळीवर तयार करण्यात आले होते. हे आराखडे निवडणूक आयोगास सादर करण्यात आले असून शनिवारी तपासणी करण्यात येणार होती. ६९ गटांचे प्रस्ताव तयार करून आयोगास पाठविणे ही प्रक्रिया गोपनीय असते. परंतु अनेक ठिकाणी गोपनियतेचा भंग झाला आहे. याबाबत प्रशासनाने काही तक्रारी देखील आहेत. दरम्यान, प्रशासनाने पाठविलेले आराखडे नियमात आहेत का? याची आयोगाच्या कार्यालयात तपासणी होणार आहे. त्यानंतर आराखडे प्रसिद्ध केले जातील, असे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक विभागाने सांगितले.
Advt