suspend

पेपरफुटी प्रकरण; दोन शिक्षक निलंबित

न्यूज ऑफ द डे बीड

बीड जि.प.च्या सीईओंची कारवाई

बीड : आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरणात आरोपी असलेल्या दोन्ही शिक्षकांना बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दणका दिला आहे. त्यांना सोमवारी सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

उद्धव प्रल्हाद नागरगोजे (सहशिक्षक, जि.प.प्रा.शा. कुक्कडगाव, ता. बीड), विजय नागरगोजे (सहशिक्षक काकडहिरा, ता. बीड) असे निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. या दोघांचाही आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणात सहभाग असल्याने पुणे सायबर विभागाने गुन्हा दाखल करुन अटक केली. त्यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दोन्ही शिक्षकांना सेवेतून निलंबित केले आहे.

Tagged