ACB TRAP

लाचखोर ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात!

अंबाजोगाई क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.13 : सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर बिल काढून दिल्याबद्दल मोबदला म्हणून ग्रामसेवकाने लाचेची मागणी केली. या लाचखोर ग्रामसेवकाला मंगळवारी (दि.13) सायंकाळच्या सुमारास पंचायत समितीच्या आवारात आठ हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुजारी अशोक विठ्ठलराव (वय 52 रा.हानुमान मळा, अंबाजोगाई) असे लाचखोर ग्रामसेवकाचे नाव आहे. पुजारी हे धावडी ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांनी तक्रारदाराकडे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक शौचालयाचे पूर्ण केलेल्या कामाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून 10 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडअंती 8 हजार लाच घेण्याचे ठरले. मंगळवारी अंबजोगाई येथील पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आठ हजार रुपयांची लाच स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 7 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल लांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली बीड उपअधीक्षक शंकर शिंदे, पोह.सुरेश सांगळे, हनुुमंत गोरे आदींनी केली आहे.

Tagged