accident

टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.1 : रस्त्याने जात असलेल्या वृद्धाला भरधाव टेम्पोने जोराची धडक दिली. यामध्ये वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.1) सकाळी 11 च्या सुमारास धुळे-सोलापूर महामार्गावर कोळवाडी फाटा येथे घडली.
शंकर तात्याबा जाधव (वय 70 रा.कोळवाडी ता.बीड) असे मयत वृद्धाचा नाव आहे. ते सकाळी रस्त्याच्याकडेने जात असताना बीड तालुक्यातील कोळवाडी फाटा येथील बस स्टॅन्डसमोर त्यांना सोलापूहून जळगावकडे जाणार्‍या आयशर टेम्पोने (एमएच-19 झेड-5497) जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सोनवणे, एकाळ यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. टेम्पोसह चालकास ताब्यात घेतले असून प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tagged