accedent

अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो रिक्षा पलटी; चार प्रवाशी जखमी

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

बीड दि.1 :  प्रवाशी घेऊन जाणार्‍या रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये रिक्षा पलटी झाल्याने चार प्रवाशी जखमी झाले. तर एक प्रवाशाची प्रकृती चिंताजणक आहे. हा अपघात परळी-सिरसाळा रस्त्यावर मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास ब्रम्हवाडी शिवारात झाला.
ब्रम्हवाडी येथून अ‍ॅटो रिक्षा (एम.एच.23 टी.आर.311) हा काही प्रवाशांना घेऊन परळीकडे निघाला होता. टोकवाडी जवळ या रिक्षाला अज्ञात वाहनांने जोराची धडक दिली. रिक्षा पलटी झाल्याने प्रवाशी शिवमुर्ती रोडे, वनुबाई माने, आशाबाई फड, सागरबाई फड जखमी झाले असून यातील शिवमुर्ती रोडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविण्यात आले. तर इतर जखमींवर परळी येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Tagged