गोदावरी नदीपात्रात शॉक बसल्याने शेतमजुराचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

माजलगाव दि.1 : शेतीला पाणी देण्यासाठी गोदावरी नदीपात्रात टाकलेली मोटार बिघडल्याने दुरूस्तीसाठी गेलेल्या 30 वर्षी शेतमजुरांचा शॉक लागून मृत्यु झाला. ही घटना तालुकयातील मोगरा येथे मंगळवारी दुपारी घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
माजलगाव तालुक्यातील मोगरा येथील शेतमजुर गजानन मारोतराव शिंदे (वय 30 वर्षे) हे गोदावरी नदीतून शेतीसाठी पाणी घेत होते. या दरम्याण विद्युत मोटारमध्ये बिघाड झाला होता. मंगळवार दि.1 रोजी दुपारी 1.30 वा. गोदावरी नदीपात्रातील विद्युत मोटार बाहेर काढण्यासाठी गोदावरी नदीपात्रात गेले असता शॉक लागून नदी पात्रातच मृत्यु झाल्याची घटना घडली. मयत गजानन शिंदे याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, वडिल व भाऊ असा परिवार आहे. घरातील करता पुरूषच गेल्याने शिंदे कुटूंबावर दुखःचा डोंगर कोसळला असल्याने मोगरा परिसरात हळ-हळ व्यक्त होत आहे.

Tagged