corona-death

कोरोनाचे मंगळवारी दोन बळी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोना बळींचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मंगळवारी आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

  आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, धारूर शहरातील 70 वर्षीय वृद्ध दमा, शुगर सारख्या आजारावर उपचार सुरू असताना दि.23 जुलै रोजी त्यांचे स्वॅब नमुने पॉझिटिव्ह आले होते. बाधीत अवस्थेत ते इतर आजारांशी झुंज देत असताना आज पहाटे उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेला धर्मापुरी येथील 65 वर्षीय वृद्धाचाही रात्री मृत्यू झाला आहे.  दरम्यान  सायंकाळी 9 वाजेपर्यंत  जिल्ह्याची मृत्यूसंख्या 38 होती.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged