बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम पंतप्रधान कार्यालयात उपसचिव

न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा महाराष्ट्र

बीड :  बीडचे तत्कालीन व  पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची नुकतीच पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नवल किशोर राम हे 2013 ते 2016 मध्ये बीडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. साडेतीन वर्षाच्या काळात त्यांनी बीडमध्ये चांगल्या प्रकारे जबाबदारी पार पाडली. सरकार आणि नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून प्रशासन काम करत असते. या प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकार्‍यांवर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असते. त्यांच्याकडे असलेली कार्यक्षमता, दूरदृष्टी, निर्णय क्षमता, प्रामाणिकपणा, त्यांचे वर्तन या सर्व बाबींचा परिणाम संबंधित जिल्ह्याच्या प्रशासनावर पडत असतो. कोणत्याही योजनेचे यश-अपयश हे संबंधित जिल्हाधिकार्‍याच्या कामावर ठरत असते.

काही महिन्यापुर्वी उत्कृष्ठ कामगिरी करणार्‍या 50 जिल्हाधिकार्‍यांची निवड करण्यासाठी फेम इंडिया मासिक व आशिया पोस्ट यांनी एक सर्वै केला. यामध्ये जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची निवड झाली होती. समाजाभिमुख आणि निरपेक्ष अशा उत्तम कार्याची दखल घेत नवलकिशोर राम यांची थेट पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदेश निघाल्यापासून नवल किशोर राम यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आलं आहे. परंतु एका आठवड्याच्या आतच नवल किशोर राम हे दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged