corona

बीड जिल्ह्यात कोरोना दोनशेच्या आत

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बाधितांचा टक्का ४.८२

बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.६) कोरोनाचे १८१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातून शनिवारी ३७५५ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.६) प्राप्त झाले, त्यामध्ये १८१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३५७४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ३०, अंबाजोगाई ११, आष्टी ३८, धारूर १०, गेवराई १६, केज २९, माजलगाव १२, परळी १, पाटोदा ८, शिरूर १० तर वडवणी तालुक्यात १६ असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांचा टक्का ४.८२ वर आला आहे. त्यामुळे जिल्हा अनलॉक होण्याच्या वाटेवर आहे.

Tagged