nathsagar

नाथसागरातून पाण्याचा विसर्ग सुरु

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे मराठवाडा

चंद्रकांत अंबिलवादे । पैठण
दि.29 : जायकवाडी प्रकल्प अर्थात नाथसागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्याकडे वाटचार करीत आहे. त्यामुळे बुधवार (दि. 29) रोजी या प्रकल्पाच्या 4 दरवाजांवाटे पाणी सोडण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष आगळे, गटविकास अधिकारी ओमप्रकाश रामावत, धरण शाखा अभियंता विजय काकडे यांची उपस्थिती होती.

पाणी सोडण्यापुर्वी धरणाखालील पुलावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.


धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार धरणात 61 हजार 894 क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुुरु आहे. पहिल्या टप्प्यात 20 हजार 96 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. टप्प्या टप्प्याने हा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा ईशारा देण्यात आला असून कोणीही नदीकाठी जाऊ नये, असे अवाहन करण्यात आले आहे. जायवकवाडी प्रकल्प सध्या 92 टक्के भरलेला आहे. परंतु धरण पाणलोट क्षेत्रात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. शिवाय नाशिक, नगर भागातील सर्वच धरणे भरलेली असल्याने विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

जायकवाडी धरणाच्या चार दरवाज्यावाटे पहिल्या टप्प्यात विसर्ग सुरु करण्यात आला.

माजलगाव धरणातुनही विसर्ग सुरुच
दरम्यान माजलगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबला असला तरी बुधवारी देखील माजलगाव धरणातून विसर्ग सुरुच होता. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून बुधवारी 10 वाजता 21 हजार 971 क्युसेक प्रतिसेकंदाने सिंदफणा नदीपात्रात विसर्ग सुरु असल्याचे धरण शाखा अभियंता शेख यांनी सांगितले. आजच गोदापात्रात जायकवाडीचे पाणी सोडण्यात आले आहे. गोदावरी आणि जायकवाडी या दोन्ही नद्यांचा संगम माजलगाव तालुक्यातल मंजरथ येथे होतो. त्यामुळे सिंदफणेचा तुंब तयार होईन सांडस चिंचोरी, देपेगाव, मनूर, नागडगाव, रोशनपुरी, शिंपेटाकळी आदी गावांना धोका होण्याची शक्यता आहे.

Tagged