योगदिनाची थीम पंतप्रधान मोदींकडून जाहीर, घरीच राहून योगसाधना करण्याचे आवाहन

देश विदेश

21 जून या दिवशी दरवर्षी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जातो

दिल्ली ः घरीच राहा आणि कुटुंबीयांसोबत करा योग असं म्हणत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीची आंतरराष्ट्रीय योगदिनाची थीम जाहीर केली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये योगासनं करणं तरुण वर्गात लोकप्रिय होत चाललं आहे, याचा विशेष आनंद होत आहे आपण यावर्षी 6 वा योग दिवस साजरा करत आहोत. हा जनतेने सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याचा दिवस असतो. मात्र यावर्षी आपल्याला हा योग दिवस सार्वजनिकरित्या साजरा करता येणार नाही. या वर्षीची थीम घरीच राहून कुटुंबीयांसोबत करा योग हि असल्याचं मोदींनी जाहीर केलं.

दरवर्षी योग दिवस हा मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरा होतो, मात्र आता परिस्थिती तशी नाही. त्यामुळे करोनाच्या आधीच्या काळात आपण ज्याप्रकारे योग दिवस साजरा करत होतो तसा योग दिवस आपल्याला साजरा करता येणार नाही. मात्र प्रत्येकाने घरात राहून योग दिवस साजरा करायचा आहे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged