gwm car

चीन : तिकडे हल्ला इकडे गुंतवणूक

देश विदेश महाराष्ट्र

पुण्यात तळेगावात होणार कार उत्पादन करणारा 7600 कोटींचा प्रकल्प

पुण्यात तळेगावात होणार कार उत्पादन करणारा 7600 कोटींचा प्रकल्प

पुणे, दि.17 : चीन सैनिकांच्या हल्ल्यात काल 20 भारतीय जवान शहीद झाले आणि इकडे चीनची कार उत्पादन करणारी आघाडीची कंपनी ‘ग्रेट वॉल मोटर्स’ (जीडब्ल्यूएम) ने मंगळवारी महाराष्ट्रात उत्पादन प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार (एमओयू) केल्याचे जाहीर केले. यानुसार कंपनी तब्बल 1 बिलियन डॉलरची (जवळपास 7600 कोटी रुपये) गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक पुण्याच्या तळेगाव येथील एमआयडीसीत होत आहे.

‘ग्रेट वॉल मोटर्सने’ तळेगावात स्थापन करण्यात येणार्‍या प्रकल्पात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्षात 3 हजार लोकांना रोजगाराची संधी निर्माण होत आहे. हा अत्याधुनिक रोबोटिक्स तंत्रज्ञानासह उत्पादन घेता येणारा एक स्वयंचलित प्रकल्प आहे. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाच्या प्रीमियम प्रॉडक्ट्सचे उत्पादन, आर अ‍ॅन्ड डी सेंटर, पुरवठा साखळी तयार करण्यात येणार अशी माहिती जीडब्ल्यूएमच्या भारतीय सहाय्यक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पार्कर शी यांनी दिली.

कार्यारंभ आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@karyarambhbeed) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tagged