fire

फोटो स्टंट पडला महागात; गोळी लागून युवकाचा मृत्यू

क्राईम न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

नगर दि.31 सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तरुण वेगवेगळे स्टंट करतात. असाच एक स्टंट एका युवकाच्या जीवावर बेतला आहे. तोंडामध्ये गावठी पिस्तुल घालून व्हिडीओ तयार करताना अचानक पिस्तुलचे बटन दबल्याने गोळी लागून युवकाचा मृत्यू झाला. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील गुंजाळे गावात घडली.

प्रदिप एकनाथ पागिरे (रा.गुंजाळे ता.राहुरी जि.अहमदनगर) असे मयत युवकाचे नाव आहे. प्रदिप हा सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्यासाठी तोंडात गावठी पिस्तुल घालून फोटो शुट करत होतो. यावेळी अचानक बटन दबल्याने गोळी सुटली. ही गोळी लागल्याने प्रदिपचा मृत्यू झाला. घटनास्थळी राहुरी पोलीसांनी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. त्यामुळे असे जीवावर बेतणारे स्टंट करण्यापूर्वी विचार करणे महत्वाचे आहे. असा साधा वाटणारा स्टंटही तुमच्या जीवावर बेतू शकतो.

Tagged