बीड जिल्हा मजूर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे बीड

ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट यांच्या प्रयत्नांना यश

शुभम खाडे । अंबाजोगाई
दि.१० : जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्वाची संस्था असलेल्या बीड जिल्हा मजूर संस्थेच्या संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाली आहे. ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे संचालक मंडळ बिनविरोध निवडण्यात यश आले आहे.
बीड जिल्हा मजूर संस्थेच्या संचालकांच्या 16 जागांसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली होती. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि.10) प्रत्येक जागेसाठी एकच अर्ज दाखल करण्यात आला. सर्वसाधारण मतदारसंघातून बद्रीनाथ दुधाराम जटाळ (बीड), शब्बीर मन्सब शेख (वडवणी), परमेश्वर दत्तात्रय तिडके (धारूर), राधाबाई नामदेव कटाळे (केज), बन्सीधर एकनाथ सिरसट (अंबाजोगाई), भास्कर धोंडीराम नागरगोजे (परळी), माधव सर्जेराव सोनवणे (माजलगाव), दिलीप विट्ठलराव माने (गेवराई), भगवान काकासाहेब सोनवणे (शिरूर कासार), अमृत श्रीरंग देसाई (पाटोदा), सुनिता काकासाहेब देसाई (आष्टी), महिला राखीव मतदारसंघातून शकुंतला बाळासाहेब हावळे (बीड), संध्या मंगेश देशमुख (केज), भटक्या जमाती मतदारसंघातून अंकुश दगडू राठोड (बीड), अनुसुचित जाती जमाती मतदारसंघातून वसंत भुजंगराव गोरे (अंबाजोगाई), इतर मागासवर्गीय मतदारसंघातून आनंद सुभाष क्षीरसागर (बीड) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा मजूर संस्थेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी, सभासदांनी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थेचे प्रशासन विभागाचे सहाय्यक निबंधक गोपालकृष्ण परदेशी यांनी काम पाहिले. नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले जात आहे.

बन्सीअण्णा सिरसाट यांनी 35
वर्षे सांभाळली अध्यक्षपदाची धुरा
जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्वाची संस्था असलेल्या बीड जिल्हा मजूर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा बन्सीअण्णा सिरसाट यांनी तब्बल 35 वर्षे यशस्वीरित्या सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन पुन्हा एकदा संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.

Tagged