पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना पोलीस कोठडी

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड


बीड दि.11 : परळी येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली आहे. त्यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. नऊ वर्षापूर्वीच्या कोठडीतील मृत्यु प्रकरणात ही कारवाई झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, २०१४ मध्ये परळी शहर पोलीस ठाण्यात एका आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यु झाला होता. पोलिसांनी सदर प्रकार आत्महत्येचा असल्याचे सांगितले होते. मात्र मयताच्या नातेवाईकांनी या प्रकरणात कारवाईसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करुन राज्य गुन्हा अन्वेषण विभागाच्या बीड येथील पथकाने याचा तपास सुरु करत गुरुवारी परळी पोलीस ठाण्यातील तत्कालीन अधिकारी असलेले व सध्याही परळीमध्येच कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांना अटक केली. त्यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे.

Tagged