अखेर हरिभाऊ खाडेंना बेड्या!

बीड

बीड दि.23 ः एक कोटीच्या लाच प्रकरणात फरार असलेले आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या शोधार्थ चार पथके रवाना करण्यात आली होती. अखेर गुरुवारी (दि.23) हरिभाऊ खाडेंना अटक करण्यात बीड एसीबीला (beed acb team) यश आले आहे. (pi haribhau khade arrested)

आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार रविभुषण जाधव यांनी तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी व प्रॉपर्टी जप्त न करण्यासाठी तब्बल एक कोटीची लाच मागितली होती. तडजोडअंती 30 लाख देण्याचे ठरले. त्यापैकी पाच लाखांची लाच स्विकारताना कुशाल प्रविण जैन यास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. तो न्यायालयीन कोठडीत असून हरिभाऊ खाडे, रविभुषन जाधवर हे दोघे गायब होते. त्यांंच्या शोधार्थ बीड एलसीबी, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर एसीबीचे पथके रवाना केली होती. अखेर बीड एसीबीने हरिभाऊ खाडेला अटक केली आहे. विशेष म्हणजे हरिभाऊ खाडेच्या घरझडतीत एक कोटी 8 लाख रोकड, एक किलो सोने, पाच किलो चांदी सापडली होती. तर रविभुषण जाधवरच्या घरात 25 तोळे सोने सापडले होते.

Tagged