राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ.नरेंद्र काळे

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे बीड

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली नियुक्ती

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदवीधर संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी अंबाजोगाईचे डॉ.नरेंद्र काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील पक्ष कार्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल मराठवाडा विभागाचे पदवीधर आमदार सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. नरेंद्र काळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटमध्ये पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी, डॉक्टर सेल व पक्षाच्या विविध जबाबदारीच्या पदावर मी जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न आजवर केला आहे. या पुढील काळात ही राष्ट्रीय नेते खा. शरद पवार यांचे विचार सुशिक्षित वर्गात पोहचवण्यासाठी प्रयत्न करेन. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, कोषाध्यक्ष मा.आ. हेमंत टकले, सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्यासह पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करीन, असे म्हटले आहे.

Tagged