वीज चोरीचे प्रकरण दाखल न करण्यासाठी विद्युत सहाय्यकाने स्वीकारली लाच, खाजगी इसमाचे प्रोत्साहन
बीड दि.6 : तक्रारदाराच्या मीटरची पाहणी करून वीज चोरीचा आरोप दाखल न करण्यासाठी विद्युत सहाय्यकासाठी खाजगी इसमाने लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना बीड एसीबीने खाजगी इसमास शुक्रवारी (दि.6) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुनम लहु आमटे (वय 24, व्यवसाय नोकरी , विद्युत सहायक , बीडशहर शाखा 5 , 33/11 के.व्ही . उपकेंद्र धानोरा रोड, अंकुश नगर, बीड रा.काशीनाथ नगर , पांगरी रोड, बीड) यांच्यासाठी लाच घेताना खाजगी इसम माने यास रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांचे अंकुश नगर येथील राहते घराचा विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने 33/11 के. व्ही. कार्यालयात दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी तोंडी तक्रार केली होती. त्यावरुन दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी यातील लोकसेक श्रीमती पुनम आमटे व त्यांचे खाजगी मदतनीस यांनी तक्रारदार यांचे घरी भेट दिली . मिटरची पाहणी करुन विज चोरीचा आरोप करुन मिटर काढुन घेतले. व तक्रारदार यांना विज चोरीचे प्रकरण दाखल न करण्यासाठी वीस हजार रुपयाची मागणी करुण तडजोडअंती 16 हजार रुपयाची मागणी पंचासमक्ष केली तसेच लोकसेवक श्रीमती आमटे यांचे सांगणेवरुन खाजगी इसम माने यांनी लाच रक्कम मिळुन देणेकरीता प्रोत्साहन दिले. शुक्रवारी श्रीमती आमटे यांचे विरुद्ध त्यांचे कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन केले असता लोकसेवक श्रीमती आमटे यांनी तक्रारदार यांचेकडुन लाच रक्कम 16 हजार रुपये स्विकारताच त्यांना लाच रकमेसह रंगेहात पकडण्यात आले आहे. लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन शिवाजी नगर बीड येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बगाटे, भरत गारदे, अमोल खरसाडे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड , अविनाश गवळी , स्नेहलकुमार कोरडे , अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे यांनी केली.