स्विमिंग कोचची गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड – शहरातील चंपावती क्रीडा मंडळ येथील स्विमिंग कोचने येथीलच शौचालयामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
शहरातील पालवन चौकात असलेल्या बांधकाम विभागाच्या मध्ये राहणारा अक्षय कांबळे हा गेल्या काही वर्षांपासून चंपावती क्रीडा मंडळ येथे असलेल्या स्वीमिंग पूल येथे प्रशिक्षक म्हणून काम करत होता. रात्री त्याने स्वीमिंग पूल येथे असलेल्या बाथरूम मध्ये गळफास घेतला,सकाळी शहरातील नागरिक क्लब वर गेले असता ही घटना उघडकीस आली.

Tagged