sumant dhas

सुमंत धस : राजकारणातील आश्वासक चेहरा

केज न्यूज ऑफ द डे बीड

त्ता कोणाचीही असो मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मात्र सदैव चर्चेत असतो. पक्षाध्यक्ष राज ठाकरे raj thakare यांची भाषणे, पक्षाची आंदोलने, विविध योजना अन् ‘लाव रे तो व्हिडीओ’सारख्या उपक्रमांमुळे चर्चा होते. अशा चर्चेतील पक्षाची ध्येय-धोरणे राबवत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात देखील मनसे सक्षम विरोधी पक्षांच्या यादीत गणला जात आहे. यात तब्बल 11 वर्षे मनसेत सक्रिय असलेल्या आणि गत 7 वर्षापासून बीड जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सक्षमपणे पेलणार्‍या सुमंत धस यांचे मोलाचे योगदान आहे, ते नाकारून चालणार नाही. मनसेचे ‘इंजिन’ रुळावर आणण्यासाठी त्यांचा आजपर्यंतचा ‘प्रवास’ राजकारणात येण्यास इच्छुक नवतरुणांसाठी दिशादर्शक आहे. कोणतीही कौटुंबिक, राजकीय पार्श्वभूमी नसताना घरची जेमतेम परिस्थिती असूनही राजकीय क्षेत्रात स्वतःच्या कार्यक्षमतेच्या जोरावर कर्तृत्व सिद्ध करणार्‍या बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्वामध्ये सुमंत धस sumant dhas यांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.
सन 2009 मध्ये सुमंत धस यांनी सोलापूर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थीदेशपासून ते ‘मनविसे’मध्ये सक्रिय झाले. विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून कामाची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर ते बीड जिल्ह्यात आले, त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर बीड जिल्हाध्यक्षाची धुरा सोपविली. या पदापर्यंतचा प्रवास करताना पक्ष विचारांशी कधी तडजोड केली नाही. कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलण्याची पद्धत अलिकडे राजकारणात आली, सुमंत धस हे मात्र सत्ता असो वा नसो पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसेत एकनिष्ठपणे काम करत राहिले. राजकारणात आरोप-प्रत्यारोपाला फार महत्व न देता बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे.

बीडच्या लोकसभा निवडणुकीत व परळी विधानसभा निवडणुकीत मनसेला विचारात घ्यावे लागले होते. त्यावेळी बीड लोकसभा व परळी विधानसभेत मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा घेतला होता. यावरुन जिल्ह्याच्या राजकारणात सुमंत धस व मनसेचे स्थान बळकट असल्याची प्रचिती येते. राज्यातील ऊसतोड मजूर महिलांच्या आरोग्याचा प्रश्न, मजूरांच्या न्याय हक्काच्या प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर मनसेतील पक्षश्रेष्टींकडून पाठबळ मिळते. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करणार्‍या सुमंत धस यांच्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप झाल्यास नेते पदावरील श्रेष्ठींपासून ते मनसेचे नेते अमित ठाकरे amit thakare यांच्यापर्यंत अनेजण सुमंत धस यांच्या पाठिशी सक्षमपणे उभे राहतात, हे अनेकदा दिसून आले आहे. त्यांच्या कामाची दखल म्हणून शेतकर्‍यांच्या प्रश्नावर बोलण्याची संधी थेट पक्षाच्या अधिवेशनात दिली गेली. लाखोंच्या संख्येने उपस्थित मनसैनिकांना त्यांनी संबोधित केले, ही त्यांच्या कामाची पावती मानावी लागेल.
विद्यार्थी दशेतील सोलापूर विद्यापीठातील आंदोलनांपासून ते धनेगाव धरणाचे पाणी रोखण्यासाठीचे जलसमाधी आंदोलन, परळीच्या माजी मंत्र्यांच्या घराला घेराव ही त्यांची गाजलेली निवडक आंदोलने. शासन, प्रशासनाला ताळ्यावर आणण्यासाठी नानातर्‍हेची शेकडो आंदोलने केली. त्यामुळे प्रशासनावर वचक निर्माण करण्यात सुमंत धस हे यशस्वी ठरले. प्रशासनातील गैरव्यवहार असो वा शासनाची मनमानी धोरणे याला मनसेकडून प्रखर विरोध होतो, अनेकदा राज्यव्यापी विषयाला देखील बीड जिल्ह्यातून वाचा फोडली जाते. अधिकार्‍यांना घाम फोडणारी आंदोलने अन् मुद्दे मनसेकडून अनेकदा उपस्थित केले जातात. परिणामी, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवताच प्रश्न मार्गी लागतो. तसेच, राजकीय जीवनाबरोबर सुमंत धस यांनी शेतीमाती व सर्वसामान्यांची नाळ कायम ठेवली. शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढ देतानाच त्यांनी आपण समाजाचे देणे लागतो याचा विसर होऊ दिला नाही. आजपर्यंत मनसेच्या माध्यमातून जलसंधारणची कामे, टँकरद्वारे पाणी पुरवठा, पाणी साठ्यासाठी टाकी वाटप, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदतीसह शिलाई मशीन, शेतकर्‍यांना बि-बियाणे, खते, तसेच कोरोनाच्या संकटकाळात खाजगी व शासकीय डॉक्टरांना पीपीई कीट, सॅनिटायजर वाटप अशा मदती स्वखर्चातून केल्या.
सर्वसामान्य कुटुंबातील सुमंत धस यांच्याशी जोडल्या गेलेल्या सर्वसामान्य व्यक्ती, तरुणांचे निर्माण केलेलं जाळं पाहता सुमंत धस हे राजकारणातील खरे ‘श्रीमंत’ वाटतात. त्यांच्याकडे जिल्ह्यातील सक्षम विरोधक म्हणून पाहिले जाते. प्रस्थापित युवा नेत्यांच्या तुलनेत सुमंत धस यांची राजकीय प्रगती कैक पटीने अधिक वाटते. त्यामुळे इतर युवा नेत्यांच्या तुलनेत सुमंत धस खरोखरीच एक अश्वासक चेहरा वाटतात…

जिल्हा परिषदेच्या सभागृहात हा चेहरा दिसावा

जेव्हा कोणी प्रामाणिकपणे आणि तळमळीने जनसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करतात अशा माणसाची दखल पक्ष आणि जनता निश्चितपणे घेत असते. सुमंत धस यांच्या सारखा सामान्य कार्यकर्ता खर्‍या अर्थाने बीड जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिसायला हवा. जेणेकरून सामान्यांसाठी असलेल्या योजना खर्‍या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. मनगट आणि थैलीशाहीच्या जोरावर लढविल्या जाणार्‍या निवडणुकात जर लोकशाही शाबूत ठेवायची असेल सुमंत सारख्या तळागाळातून वर आलेल्या कार्यकर्त्यांचा विचार व्हायला हवा. सुमंत नक्कीच विकासाचं नवं स्वप्न घेऊन जनतेच्या दारात जाईल. पण थैली घेऊन फिरणार्‍यांना सुमंतचं राजकारण रुचेल का? आजच्या बरबटलेल्या राजकारणाच्या शुध्दीसाठी सुमंत हे एक आशेचा किरण वाटतात. थैलीशाहीला टक्कर द्यायची असेल तर सुमंतसारखे कार्यकर्ते सभागृहात असायलाच हवेत. सुमंत यांचं राजकारण उत्तरोत्तर जनसामान्यांच्या कल्याणासाठी बहरत जावे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Tagged