बीड जिल्हा : आणखी 6 पॉझिटीव्ह

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यातून रविवारी 248 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यापैकी 6 पॉझिटीव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली आहे.

रुणामध्ये बीड शरातील जुना बाजार येथील 38 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुलगा तर अंबाजोगाई येथील संत कबीर नगरमधील 40 वर्षीय महिला (अलिबाग हुन आलेली), तसेच आष्टी तालुक्यातील सुरडी येथील 30 वर्षीय महिला (मुंबई हुन आलेली), गंगादेवी येथील 65 वर्षीय पुरुष व परळी तालुक्यातील 58 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर तिघांचे अहवाल अनिर्णित आहेत. दरम्यान, जिल्ह्यातून एकूण रुग्ण संख्या 152 तर उपचाराखालील रुग्ण संख्या 33 आहे.
पाठविण्यात आलेल्या स्वॅबची आकडेवारी
जिल्हा सामान्य रुग्णालय, बीड -32, स्वा.रा.ती.ग्रा.वै.महाविद्यालय आंबाजोगाई-2, उपजिल्हा रुग्णालय, परळी-50, उपजिल्हा रुग्णालय केज-28, उपजिल्हा रुग्णालय गेवराई-19, ग्रामीण रुग्णालय, आष्टी-16, सीसीसी, बीड -55, सीसीसी, अंबाजोगाई -46

Tagged