sambhajinagar police

परळीत तीन लाखांचा गुटखा पकडला

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड

संभाजीनगर पोलीसांची कारवाई

परळी : कोरोना रुग्ण आढळल्यामुळे परळी शहरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन असतानाही चक्क बोलेरो पिकअपमध्ये गुटखा घेवून जात असल्याची माहिती संभाजीनगर पोलीस ठाण्यातील विशेष पथकाला मिळाली. त्यांनी पिकअप ताब्यात घेत तीन लाखांचा गुटखा जप्त केला.

एका बोलेरो bolero पिकअपमध्ये (एमएच-44 9245) गुटखा घेवून जात असल्याची माहिती संभाजीनगर विशेष पथकाला मिळाली. माहिती मिळताच परळी शहरातील बरखतनगर येथे पिकअप अडवण्यात आला. तपासणी केली असता पिकअपमध्ये तीन लाखाचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील पोह.व्यकंट भताने, पोना.दत्ता गित्ते, बाबासाहेब आचार्य यांनी केली. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परळी शहरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले असतानाही गुटख्याची वाहतूक होत असल्याचे आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

Tagged